बेस्ट बसेस पेट्रोल पंपावर डिझेल भरायला रांगेत दिसल्यास आश्चर्य मानू नको. कारण घाऊक डिझेलचा दर लिटरला २५ रुपये वाढल्याने बेस्टच्या ९०० बसेस डिझेल भरायला पंपावर भरायला जातील. बेस्टने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, डिझेल बसेस पेट्रोल पंपावर पाठवण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही डिझेल बसना पंपावरून डिझेल भरायला सांगितले आहे. आमच्याकडे ९०० डिझेल बस आहेत. डिझेल ११९ रुपये लिटर झाल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी सांगितले की, गेल्या १५ दिवसात घाऊक डिझेलच्या किंमतीत दोन वेळा वाढ झाली आहे. पहिल्या टप्प्यात डिझेलच्या किंमतीत ५ रुपये तर आता २५ रुपये लिटर वाढ झाली. डिझेलपोटी बेस्टला १२ कोटी रुपयांचा भार दरमहा सोसावा लागतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती ४० टक्क्याने वाढल्या आहेत. बेस्टकडे ३५४० बस आहेत. त्यापैकी ९०० हून अधिक बस डिझेलच्या आहेत.
डिझेलच्या बसचा प्रति किलोमीटर खर्च ४० रुपये असून सीएनजीचा २६ रुपये प्रति किमी आहे. तर वीजेच्या बसचा खर्च प्रति किमी ९ रुपये आहे. शहरात २२५ पेट्रोल पंप आहेत. कार व दुचाकीच्या पंपावर मोठ्या रांगा असतात. बेस्ट बस त्या रांगेत उभ्या राहिल्यास आणखी विलंब लागणार आहे.