BEST
BEST 
मुंबई

विसराळू प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा 'बेस्ट' लिलाव

प्रतिनिधी

बस पकडण्याच्या घाईगडबडीत अनेक प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू बेस्ट बसमध्ये विसरल्याचे प्रकार घडत असतात. स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप, छत्र्या, कॅमेरा अशा ब्रॅडेड वस्तू प्रवासी विसरतात. या विसरलेल्या वस्तू पुरावा सादर करत घेऊन जा, असे आवाहन बेस्टच्या वतीने करण्यात येते; मात्र अनेक वेळा वस्तू घेण्यासाठी प्रवासी येत नसल्याने त्या वस्तुंचा लिलाव करण्यात येत असून, ११ मे रोजी महागड्या वस्तुंचा लिलाव करण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या वस्तू सर्वसामान्य लोकांना घेता येणार नसून घाऊक घेणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांना या वस्तू घेता येणार आहेत. एकूण २४५ बसगाड्या विक्रीस काढण्यात येणार असून, ३० जीप व १३ लॉरीज बेस्टने विक्रीस काढल्या आहेत. मोबाईल फोन, लॅपटॉप, स्मार्ट वाॅच प्रत्येक वापरत असतात; मात्र घाईगडबडीत अनेक प्रवासी आपल्या किंमती वस्तू बेस्ट बसमध्ये विसरतात. स्मार्ट मोबाईल फोन, लॅपटॉप, स्मार्ट वाॅच प्रवासा दरम्यान, विसरल्याचे अनेकदा ऐकण्यात येते; मात्र बेस्ट बसने प्रवास करताना कपडे, सुतार कामाच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू अगदी घरातील कामात उपयोगी छोटीशी वस्तू बेस्ट बस मध्ये विसरतात.

वस्तू बेस्ट बसमध्ये विसरल्यानंतर अनेक प्रवासी बेस्ट बस आगारात संपर्क साधतात आणि गहाळ वस्तू परत मिळवतात. मात्र अनेक प्रवासी विसरलेली वस्तू परत मिळणार नाही, असा विचार करतात. परंतु प्रवाशांने संपर्क साधल्यावर ठोस पुरावा दिल्यानंतर संबंधित प्रवाशाला ठरलेले दर आकारुन वस्तू परत दिली जाते; मात्र जे प्रवासी आपली वस्तू घेण्यासाठी येतच नाही, अशा प्रवाशांच्या गहाळ वस्तुंचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.

या गहाळ वस्तु आणि संख्या!

१४७ घड्याळे, २९५१ छत्र्या, १३० स्मार्ट फोन, विविध कंपन्यांचे साधे १ हजार २८४ मोबाईल, इयर फोन , डोंगल, कपडे, प्लास्टिक वस्तू मध्ये हॅलमेंट, फेस शिल्ड, लेडीज चप्पल, वाॅटर बाॅटल, ब्लू टूथ इयर फोन, की बोर्ड व माऊस, पाॅवर बँक, लॅपटॉप , कॅमेरा स्टॅन्ड, कि बोर्ड, कॅल्क्युलेटर

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज

५ लाख पर्यटकांचा प्रवास; ऐतिहासिक नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मिळाला तब्बल 'इतक्या' कोटींचा महसूल

खासगीकरणाची 'बेस्ट' धाव ! बेस्टमध्ये आता ड्राफ्ट्समनही कंत्राटी; अंतर्गत कामासाठी कंत्राटी पद्धत