मुंबई

वीजपुरवठ्यात 'बेस्ट'नंबर वन

Swapnil S

मुंबई : स्वस्त व अखंडित वीजपुरवठा करणारी कंपनी म्हणून बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाला सन्मानित करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रमोद देव, माजी अध्यक्ष सीईआरसी यांच्या हस्ते पारितोषिक व घनश्याम प्रसाद, अध्यक्ष, केंद्रीय विद्युत प्राधिकरण व सचिव भारत सरकार, यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन इतर अनेक मान्यवराच्या उपस्थितीत आयपीपीए पुरस्कार २०२४ सोहळयात बेस्ट उपक्रमाला "उत्कृष्ट योगदान" साठी गौरविण्यात आले. इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर्स असोसीएशन ऑफ इंडिया तर्फे ८ ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान शुन्य फार्म रिट्रीट, बेळगाव, कर्नाटक येथे २४ व्या रेग्युलेटर पॉलिसी मेकर्स रिट्रीटमध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. बेस्ट उपक्रमाचे उत्कृष्ट नेतृत्व व स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत कार्यपद्धतींना चालना देण्यासाठी उचललेली पावले व ऊर्जा क्षेत्रातील अतूट बांधिलकी व्यापकपणे ओळखली गेली, तसेच त्याची प्रशंसाही केली गेली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त