प्रातिनिधिक फोटो
मुंबई

Coastal Road: कोस्टल रोडवर आजपासून धावणार 'बेस्ट'ची एसी बस

BEST: बहुचर्चित कोस्टल रोडवरून आजपासून (शुक्रवार) वातानुकूलित बेस्ट बस धावणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रवाशांचा कोस्टल रोडवरून गारेगार प्रवास तितकाच आल्हाददायक असेल.

Swapnil S

मुंबई : बहुचर्चित कोस्टल रोडवरून आजपासून (शुक्रवार) वातानुकूलित बेस्ट बस धावणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रवाशांचा कोस्टल रोडवरून गारेगार प्रवास तितकाच आल्हाददायक असेल. बेस्टची ए-७८ क्रमांकाची बस एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक (प.) दरम्यान मरिन ड्राइव्ह, 'स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्गे' धावणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा ११ मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान १२ मार्चपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर १० जून रोजी मरीन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन १० जूनपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका गुरुवार, ११ जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. आतापर्यंत बेस्ट बसेसना वाहतुकीसाठी परवानगी नव्हती. तथापि, आता बेस्ट प्रवाशांची प्रतीक्षा संपली असून, शुक्रवारपासून प्रवाशांना वातानुकूलित बसने कोस्टल रोडची सफर करता येणार आहे.

ही वातानुकूलित बस ब्रीच कॅन्डी रुग्णालय, हाजीअली, महालक्ष्मी स्थानक मार्गे धावणार आहे. हा बस मार्ग एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) हॉटेल ट्रायडेंट नेताजी सुभाष मार्ग मरिन ड्राइव्ह - 'स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्ग' (कोस्टल रोड), पारसी जनरल रुग्णालय जंक्श्न- वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली)- महालक्ष्मी रेसकोर्स- महालक्ष्मी रेल्वे स्थानक - सात रस्ता भायखळा स्थानक (प). असा असेल. एन.सी.पी.ए. (नरिमन पॉइंट) येथून बस सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि शेवटची बस सायंकाळी ९ वाजता सुटेल, तर भायखळा स्थानक (प.) येथून सकाळी ८ वाजता सुटेल. शेवटची बस रात्री ८.५० वाजता सुटेल. या बसचे प्रवास भाडे किमान ६ रुपये, तर कमाल भाडे १९ रुपये आकारण्यात येईल. या बसमार्गावरील बसगाड्या संपूर्ण आठवडाभर कार्यान्वित राहतील. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.

दहा तासांत पंधराशे वाहनांचा प्रवास

कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा ११ मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान १२ मार्चपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर १० जूनपासून रोजी मरिन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका गुरुवार, ११ जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १५०० वाहनांनी या मार्गावरून पहिल्याच दिवशी प्रवास केला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी