मुंबई

नाहूर-मुलुंडदरम्यान शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक कर्जत-सीएसएमटी शेवटची लोकल १२.२४ ची

प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेच्या नाहूर - मुलुंड स्थानकादरम्यान १४ गर्डर लाँच करण्यात येणार आहेत. यापैकी दोन गर्डर शनिवार व रविवारी रात्री लाँच करण्यात येणार असून यासाठी शनिवारी रात्री १.२० ते रविवारी पहाटे ४.२० पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कर्जतहून सीएसएसटीच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल १२.२४ वाजता सुटेल. तर ब्लॉकनंतर सीएसएमटी स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणारी पहिली लोकल सीएसएमटी स्थानकातून पहाटे ३.५८ वाजता सुटेल.

नाहूर आणि मुलुंडदरम्यान सध्याचा रोड ओव्हरपूल वाढलेल्या वाहनांमुळे अपुरा पडत आहे. या पुलाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण १४ गर्डर्स लाँच करण्यात येणार आहेत. त्यापैकी २ गर्डर लाँच करण्यासाठी शनिवार रात्री १.२० ते रविवार पहाटे ४.२० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या लाईन, मुलुंड आणि विक्रोळीदरम्यान अप आणि डाऊन फास्ट आणि स्लो मार्ग ब्लॉक असेल. या कालावधीत रात्रीच्या उपनगरीय लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या व मेल एक्स्प्रेस ठाणे स्थानकात थांबवण्यात येतील.

या लांब पल्ल्याच्या गाड्या ठाण्यापर्यंत

ट्रेन क्रमांक- ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी मुंबई कोणार्क एक्स्प्रेस ठाणे येथे कमी होईल.

ट्रेन क्र. १२८१० हावडा-सीएसएमटी मुंबई मेल दादर पर्यंतच

या लांब पल्ल्याच्या गाड्या ६० मिनिटे उशीरा

ट्रेन क्रमांक १८०३० शालीमार-एलटीटी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक-१८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक-२०१०४ गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक-१२७०२ हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त