मुंबई

Bhagatsingh Koshyari : राज्याचे राज्यपाल राजीनामा देणार? पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा

गेले अनेक दिवस वादामध्ये अडकलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली

प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Narendra Modi) राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पदमुक्त होऊन उर्वरित आयुष्य चिंतन, मनन करण्यात घालवण्याचा मानस असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या मुंबई दौऱ्यात व्यक्त केली असल्याची माहिती राजभावातून प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकारातून समोर आली आहे.

जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत की, "महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील." ट्विट करतदेखील त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत