प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

भांडुपची दहीहंडी; परवानगी नाही; शिवसेना शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका

दहीहंडी उत्सवाची परवानगी मिळावी म्हणून हायकोर्टात धाव घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला दणका बसला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पालिकेने दहीहंडी उत्सवाची परवानगी नाकारल्यानंतर त्यात हस्तक्षेप करण्यास न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नकार देत शिंदे गटाची भांडुपमध्ये दहीहंडी उत्सव आयोजित करण्याची मागणी फेटाळून लावली.

Swapnil S

मुंबई : दहीहंडी उत्सवाची परवानगी मिळावी म्हणून हायकोर्टात धाव घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला दणका बसला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पालिकेने दहीहंडी उत्सवाची परवानगी नाकारल्यानंतर त्यात हस्तक्षेप करण्यास न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नकार देत शिंदे गटाची भांडुपमध्ये दहीहंडी उत्सव आयोजित करण्याची मागणी फेटाळून लावली.

भांडुप पश्चिम येथील गाढव नाका, लाला शेठ कंपाऊंड जवळील अशोक केदारे चौक येथे शिंदे गटाच्या संदीप जळगावकर यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भांडुप पोलीस, आरटीओ तसेच अग्निशमन विभागाने या उत्सवाला ना हरकत प्रमाणपत्र दिले असताना पालिकेने मात्र उत्सवाला परवानगी अद्याप न दिल्याने जळगावकर यांनी अॅड. प्रतीक सबराड व अॅड. अमेय सावंत यांच्या मार्फत याचिका दाखल केली.

मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा, IMD चा रेड अलर्ट

Dahihandi Utsav 2025 : कोकणनगर गोविंदा पथकाचा विश्वविक्रम! जय जवान पथकाला मागे टाकत रचले १० थर

GST ची हंडी उतरणार; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी केली दरात व्यापक बदलाची घोषणा

स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भारतीयांनी त्याग करणे आवश्यक! सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे-सेना युती; खासदार संजय राऊतांची घोषणा