मुंबई

खासगी कंपनीच्या हाती भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्र; पुढील ३ वर्षांसाठी नव्या कंपनीसोबत करार

मुंबईला भांडुप संकुलातून तब्बल ९०० दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये असलेल्या पंपाची देखभाल खासगी कंपनीमार्फत केली जाते. पंपिंग स्टेशनमध्ये महापालिकेचे कर्मचारी भरती करण्यात न आल्याने खासगी कंपनीकडून सेवा घेतली जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : मुंबईला भांडुप संकुलातून तब्बल ९०० दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये असलेल्या पंपाची देखभाल खासगी कंपनीमार्फत केली जाते. पंपिंग स्टेशनमध्ये महापालिकेचे कर्मचारी भरती करण्यात न आल्याने खासगी कंपनीकडून सेवा घेतली जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या केंद्राची देखभाल करणाऱ्या खासगी कंपनीसोबतचा कंत्राट संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता नवीन कंपनीची निवड करणार असून पुढील ३ वर्षांसाठी कंपनीसोबत करार करणार आहे.

...म्हणून खासगी संस्थेची सेवा

कर्मचारी भरती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. आजमितीसही पद सातत्य मिळवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. परंतु ही पदे भरेपर्यंत कामाची निकड आणि आवश्यकता लक्षात घेऊन ९०० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या पंपिंग स्टेशनच्या देखभालीसाठी खासगी संस्थेची सेवा घेतली जात आहे. तसेच, मुंबईला प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अविरत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी या कामाची नितांत गरज आहे आणि त्याकरता खासगी संस्थेची मदत घेतली जात आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत