संग्रहित छायाचित्र 
मुंबई

ठाकरे गटाचे खासदार संजय पाटलांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाने फेटाळली 'ती' याचिका

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा दिलासा दिला.

Krantee V. Kale

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा दिलासा दिला. एका टॅक्सी चालकाने पाटील यांच्या खासदारकीला आक्षेप घेत दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने फेटाळून लावली.

खासदार संजय दिना पाटील हे लोकसभा निवडणुकीत जवळपास २९,८०० मतांनी विजयी झाले. त्यांनी निवडणुकीत अर्ज भरताना आईचे नाव लिहिले नाही म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करत शहाजी थोरात यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत याचिकाकर्त्याच्या विनंतीनुसार ईशान्य मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या सर्व १८ उमेदवारांना या याचिकेत प्रतिवादी करण्याची मुभा दिली. मात्र याचिकाकर्त्याने या उमेदवारांना प्रतिवादी न केल्याने न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी याचिका फेटाळून लावली. त्यानंतर थोरात यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने ही पुनर्विचार याचिकाही फेटाळून लावली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस