मुंबई

बाईकची डिवायडरला धडक लागून पिता-पूत्राचा मृत्यू चेंबूर येथील अपघात; मृत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला

नवशक्ती Web Desk

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या बाईकची डिवायडरला धडक लागून झालेल्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. मृतांमध्ये रामआसरे दातादीन मौर्य, मुकेशकुमार रामआसरे मौर्या यांचा समावेश आहे. याप्रकरणी आरोपी मुलगा मुकेशकुमारविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे.

हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजता चेंबूर येथील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर पवईकडे जाणाऱ्या वाहिनीवर झाला.साोमवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून टिळकनगर पोलिसांना जय अंबेनगर झोपडपट्टीसमोर एक अपघात झाला असून, पोलीस मदतीची गरज असल्याचा कॉल आला होता. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांना दोनजण अपघातात गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी साडेसहा वाजता दोन्ही जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

चौकशीअंती मृत व्यक्तीचे नाव रामआसरे आणि मुकेशकुमार असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही पिता-पूत्र असून, मुकेशकुमार हा त्याच्या बुलेटवरुन त्याचे वडिल रामआसरे यांच्यासोबत जात होता. भरवेगात जात असताना त्याचा बुलेटवरील नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायडरला जोरात धडक दिली होती. या अपघातात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. या अपघाताला मुकेशकुमार मौर्या हाच जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

इस्रायल-इराण युद्ध भडकले; इराणचे पश्चिम आशियामधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले

मार्च महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Skincare Tips : सकाळी की रात्री? Retinol ते Vitamin C वापरण्याची योग्य वेळ कोणती? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Sunday Special Recipe : नॉनव्हेज प्रेमींसाठी खास; घरच्या घरी बनवा क्रिस्पी कोळंबी भजी