मुंबई

मेहता यांचा न्यायालयात माफीनामा; अवमान याचिकेच्या भीतीने घेतला निर्णय

काँग्रेसचे नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या संस्थेविरुद्ध खोटे आरोप केले म्हणून मुंबई उच्च न्यायालयात भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल आहे. न्यायालयाने मेहता यांना संबंधित संस्थेविरुद्ध पुन्हा चुकीची वक्तव्ये करू नयेत म्हणून मनाई केली आहे. तरीही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारून मेहतांनी महापालिका निवडणुकीत हुसेन यांच्या संस्थेविरुद्ध जाहीर सभेत वक्तव्ये केली.

Swapnil S

भाईंदर : काँग्रेसचे नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या संस्थेविरुद्ध खोटे आरोप केले म्हणून मुंबई उच्च न्यायालयात भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल आहे. न्यायालयाने मेहता यांना संबंधित संस्थेविरुद्ध पुन्हा चुकीची वक्तव्ये करू नयेत म्हणून मनाई केली आहे. तरीही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारून मेहतांनी महापालिका निवडणुकीत हुसेन यांच्या संस्थेविरुद्ध जाहीर सभेत वक्तव्ये केली. त्यावर अवमानना याचिका दाखल केली असता आ. नरेंद्र मेहता यांना न्यायालयात लेखी माफीनामा द्यावा लागला.

भाजप मेहता यांनी मीरारोड येथील 'उमराव इन्स्टिट्यूट योग्य मेडिकल सायन्स रिसर्च सेंटर' रुग्णालयाच्या संदर्भात काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांच्यावर आरोप केले होते. २०१९ साली हुसेन हे मेहतांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवत होते. आपल्या आणि संस्थेबद्दल खोटे आरोप करून जनतेत संभ्रम पसरवून निवडणूक जिंकण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप हुसेन यांनी केला होता.

२०१९ साली उमराव इन्स्टिट्यूट संस्थेने नरेंद्र मेहतांवर २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावेळी पुन्हा संस्थे बद्दल चुकीची वक्तव्ये करू नयेत असे मनाई आदेश न्यायालयाने मेहतांना होते.

न्यायालयाच्या मनाई निवडणुकीच्या आदेशानंतरही नरेंद्र मेहता यांनी महापालिका रणधुमाळीत मुझफ्फर हुसेन व त्यांच्या संस्थेवर आरोप करतानाच अनेक रुग्णांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

देशात चार कामगार कायदे अखेर लागू; नियमावली प्रसिद्ध, मर्यादेसह नवीन नियमावली केंद्र सरकारकडून अधिसूचित

मुंबई पोलीस दलाची मोठी पुनर्रचना; दोन नवीन झोनची निर्मिती, पाच प्रादेशिक विभाग, १५ झोन, चार नवीन पोलीस ठाण्यांनाही मंजुरी

पोहणेही झाले आता महाग! BMC च्या जलतरण तलावाच्या शुल्कात वाढ; सभासदांना आता ५ टक्के अधिक मोजावे लागणार

Mumbai : मोटरमनना सिग्नलची अचूक माहिती समजणार; अपघात टाळण्यास होणार मदत

सरमा पुन्हा होणार आसामचे मुख्यमंत्री; उद्या शपथविधी, राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण