मुंबई

प्रचारसभांत राज-उद्धव यांचे परस्परविरोधी व्हिडीओ? भाजपची मुंबई निवडणुकीसाठी रणनीती

मुंबई पालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने प्रचारासाठी आक्रमक रणनीती आखली असून, निवडणूक प्रचारसभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकमेकांविरोधातील जुने व्हिडीओ दाखवून प्रचार करण्याची रणनिती आखण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई पालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने प्रचारासाठी आक्रमक रणनीती आखली असून, निवडणूक प्रचारसभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकमेकांविरोधातील जुने व्हिडीओ दाखवून प्रचार करण्याची रणनिती आखण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या रणनीतीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या काळात एकमेकांवर केलेल्या टीका, आरोप, तसेच राजकीय भूमिकांतील मतभेद अधोरेखित करणाऱ्या भाषणांचे व्हिडीओ क्लिप्स या सभांमध्ये दाखवण्यात येणार आहेत. विशेषतः शिवसेना फुटीनंतर, तसेच विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या परस्परविरोधी वक्तव्यांचा प्रचारात वापर करण्याची तयारी भाजपने केली असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या प्रचार रणनीतीमागे मविआतील घटक पक्षांमध्ये असलेला अंतर्गत विसंवाद आणि विरोधाभास मतदारांसमोर आणण्याचा उद्देश आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली