मुंबई

तीन वर्षांनंतर औषध खरेदी प्रस्तावाला मंजुरी; पालिका रुग्णालयातील औषधांची आणीबाणी संपुष्टात येणार

तीन वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील मोफत औषधांचा पुरवठा करणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. २०२२ पासून प्रस्ताव रखडल्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये औषधांसाठी आणीबाणी होती. दरम्यान, औषध खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे येत्या महिन्याभरात ही औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयात उपलब्ध होणार आहे.

Swapnil S

मुंबई : तीन वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील मोफत औषधांचा पुरवठा करणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. २०२२ पासून प्रस्ताव रखडल्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये औषधांसाठी आणीबाणी होती. दरम्यान, औषध खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे येत्या महिन्याभरात ही औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आता औषधे गोळ्यांसह इतर आवश्यक साहित्यांची चणचण भासणार नसल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह विशेष आणि उपनगरीय रुग्णालये आणि दवाखाने, आरोग्य केंद्र आणि प्रसूतिगृहांमधील रुग्णांना महापालिकेच्या अनुसूचीवर औषधे मोफत पुरवठा करण्यात येतो.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video