प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना ९१० टन मोफत शाडू माती वाटप

मुंबई महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव या मोहिमेला यंदाही बळकटी देण्यात आली आहे. मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता महापालिकेकडून मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव या मोहिमेला यंदाही बळकटी देण्यात आली आहे. मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता महापालिकेकडून मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. पालिकेकडून प्रत्येक परिमंडळात १०० टनासोबत आवश्यक तेवढी शाडू माती मूर्तिकारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत असून आतापर्यंत एकूण ९१० टन इतकी शाडू माती मोफत देण्यात आली आहे. तसेच पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या एकूण ९९३ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडप परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली होती. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने नागरिकांना तसेच मूर्तिकारांना आवाहन करण्यात आले होते. तसेच ज्या मूर्तिकारांना आणखी शाडू माती हवी असेल, त्यांनी महानगरपालिकेच्या सकतस्थळावर 'नागरिकांकरीता' या रकान्यामध्ये 'अर्ज करा' या रकान्यात 'मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रौत्सव/इतर उत्सव)' या सदरामध्ये मागणी नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (परिमंडळ-२) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

सर्वाधिक वाटप कुठे?

सर्वाधिक शाडू मातीचे वितरण हे 'के पूर्व' विभागात झाले असून, या विभागात ९६ टन ६१५ किलो इतक्या शाडू मातीचे वाटप झाले. त्यापाठोपाठ 'जी उत्तर' विभागात ९१ टन २० किलो, 'पी उत्तर' विभागात ८२ टन ४५५ किलो, 'डी' विभागात ७४ टन २०० किलो; तर 'एफ दक्षिण' विभागात ७२ टन ६०० किलो शाडू माती वाटप करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद; अहमदाबादची आयोजनासाठी निवड; लवकरच अधिकृत घोषणा

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव

अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक बंधनकारक! शाळांची मान्यता रद्द करण्याचा क्रीडामंत्री कोकाटे यांचा इशारा

नेस्कोच्या जमिनीचे अधिग्रहण रद्द; हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका

मोठी बातमी! 'बँक ऑफ महाराष्ट्र'सह ४ सरकारी बँकांचे होणार विलीनीकरण? सरकार 'मेगा मर्जर'च्या तयारीत!