Mumbai : पालिकेच्या पत्राने मोटर लोडर वादावर पडदा; वारसांना नोकरी व लाभार्थी कामगारांचे संरक्षण संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : पालिकेच्या पत्राने मोटर लोडर वादावर पडदा; वारसांना नोकरी व लाभार्थी कामगारांचे संरक्षण

मुंबई पालिकेतील मोटर लोडर कामगारांवर अन्याय होत असल्याचा दावा काही कामगार संघटनांकडून केला जात असताना, महापालिका प्रशासनाने १३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या लेखी पत्राने या आरोपांना ठोस उत्तर दिले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई पालिकेतील मोटर लोडर कामगारांवर अन्याय होत असल्याचा दावा काही कामगार संघटनांकडून केला जात असताना, महापालिका प्रशासनाने १३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या लेखी पत्राने या आरोपांना ठोस उत्तर दिले आहे.

प्रशासनाने या पत्राद्वारे २८ जुलै २०२५ रोजी सहा कामगार संघटनांसोबत झालेल्या करारातील सर्व महत्त्वाच्या अटींची पुनर्पुष्टी केली असून, मोटर लोडर कामगारांचे काम, सेवा अटी, सेवाज्येष्ठता, वारसांचा नोकरीतील समावेश आणि लाभार्थी कामगारांचे हक्क याबाबत कोणताही अन्याय होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या १३ जुलै २०२६ च्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, कामगारांच्या सेवा व शर्तींमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. सध्या मिळत असलेले वेतन, भत्ते आणि आर्थिक लाभ पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. सेवाज्येष्ठतेवरही कोणताही परिणाम होणार नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कुलाब्याहून नवी मुंबई विमानतळ १६ मिनिटांत! बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

तारापोरवाला मत्स्यालयाचा होणार कायापालट; ९०० कोटींचा प्रकल्प; ३८,००० मासे व स्कुबा डायव्हिंग; ऑक्टोबरमध्ये भूमिपूजनाची शक्यता

सरसकट कर्जमाफीवर शिक्कामोर्तब; २०१९ च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना नियमित लाभ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

एसटीच्या २१३ जागांच्या विकासाला 'हिरवा कंदील'; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

FIFA World Cup 2026 : पाऊले चालती अंतिम फेरीची वाट...; दुसऱ्या उपांत्य सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर केनच्या इंग्लंडचे आव्हान