'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : ६ महिन्यांचे बायोमेट्रिक ऑडिट होणार; अनुपस्थित राहणाऱ्यांवर BMC कारवाई करणार

उशिरा उपस्थिती नोंदवणे, नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणाऐवजी इतर ठिकाणांहून हजेरी लावणे, केवळ एकदाच 'पंच' करणे किंवा हजेरी लावूनही अनुपस्थित राहणाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अमित श्रीवास्तव

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बायोमेट्रिक उपस्थितीच्या नोंदींची तपासणी करण्यासाठी ६ महिन्यांच्या ऑडिटचे आदेश दिले आहेत. उशिरा उपस्थिती नोंदवणे, नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणाऐवजी इतर ठिकाणांहून हजेरी लावणे, केवळ एकदाच 'पंच' करणे किंवा हजेरी लावूनही अनुपस्थित राहणाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० सप्टेंबरला जारी केलेल्या निर्देशानुसार, उपस्थिती करताना नियमांचे उल्लंघन आढळणाऱ्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, उपवैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे विशेष निर्देश देण्यात आले आहेत.

सायन रुग्णालयाच्या भेटीनंतर कारवाईचा बडगा

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सायन रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान उपस्थितीतील अनियमिततेबाबत चिंता व्यक्त केली होती. आरोग्य विभागाचा पदभारही सांभाळणाऱ्या लवंगारे यांनी यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या आधी 'द फ्री प्रेस जर्नल'ने वृत्त दिले होते की, जोगेश्वरी येथील एचबीटी ट्रॉमा केअर सेंटरमधील ३५ पदव्युत्तर डॉक्टरांना सिंगल पंचसह बायोमेट्रिक त्रुटींबद्दल बीएमसीने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर पालिकेने आपली तपासणी मोहीम आणखी वाढवली, ज्यामध्ये प्रमुख पालिका रुग्णालयातील सुमारे १०० डॉक्टरांना दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्याबद्दल आणि हजेरी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा मिळाल्याचे वृत्त आहे.

प्रशासकीय अधिकारीही धारेवर

अनियमितता उघडकीला आल्यानंतरही त्यावर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही ताज्या आदेशात जबाबदार धरण्यात आले आहे. उपस्थितीत तफावत असतानाही कर्मचारी आणि अधिकारी वेतन घेत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर संबंधित पर्यवेक्षक अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. याचा पाठपुरावा करत, माध्यमिक आरोग्य सेवांचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पवार यांनी ६ ऑक्टोबरला उपनगरीय आणि विशेष रुग्णालयातील कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या उल्लंघनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि संपूर्ण कारवाईचा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश बीएमसीने सर्व विभागांना दिले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका; CJP नेत्यांची विमानातच धरपकड; दिल्लीत ७,००० जण ताब्यात; ..तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार!

ज्ञानेशसह हे सरकारही जाईल - राहुल गांधी

Mumbai : तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव

Mumbai : पदार्थांच्या पौष्टिकतेची माहिती मिळणार; FDA च्या कारवाईनंतर पालिका कॅन्टीनचा निर्णय

मला नोबेल मिळायला हवा होता; डोनाल्ड ट्रम्प यांचा नॉर्वेवर संताप; ८ युद्धे सोडवल्याचा केला दावा