Mumbai : अभियंत्यांच्या अंतर्गत बदलीसाठी समिती स्थापन; ऑनलाइन पद्धतीने आता बदली होणार संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : अभियंत्यांच्या अंतर्गत बदलीसाठी समिती स्थापन; ऑनलाइन पद्धतीने आता बदली होणार

मुंबई महापालिकेत बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी आता ऑनलाइन पद्धत अंमलात आणली जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेत बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी आता ऑनलाइन पद्धत अंमलात आणली जाणार आहे. मुंबई पालिकेच्या विविध विभागात अभियंता कार्यरत असून त्यांच्या अंतर्गत बदलीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. संचालक (अभियांत्रिकी व सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बदल्यांबाबत निर्णय घेईल, असे बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध विभागात अभियंते कार्यरत आहेत. रस्ते, पूल अशा विविध कामांमध्ये अभियंत्यांचे कौशल्य दिसून येते. बृहन्मुंबई महापालिकेत विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ४ हजार ५०० अभियंते कार्यरत आहेत. यापुढे खाते अंतर्गत अभियंत्यांच्या बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी बृहन्मुंबई मनपाच्या वतीने विशेष समिती गठित करण्यात आली आहे.

पारदर्शकता राहणार

भविष्यातील बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या धर्तीवर (वाहतूक विभाग, पशुवैद्यकीय विभाग) सॉफ्टवेअर विकसित करण्यात येईल. त्या माध्यमातून अभियंत्यांची बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडण्यात येईल जेणेकरून बदली प्रक्रियेत पारदर्शकता राहील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती