प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai Crime: गोणीत सापडलेल्या मृतदेहाचा पर्दाफाश; पतीसह पाच जणांना अटक, कौटुंबिक वादातून हत्या

Mankhurd: मानखुर्द येथील एका गोणीत सापडलेल्या मृतदेहाचा पर्दाफाश करण्यात ट्रॉम्बे पोलिसांना यश आले आहे.

Swapnil S

मुंबई : मानखुर्द येथील एका गोणीत सापडलेल्या मृतदेहाचा पर्दाफाश करण्यात ट्रॉम्बे पोलिसांना यश आले आहे. रेश्मा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ती मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरची रहिवाशी होती. या हत्येप्रकरणी तिचा पती, दीर यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास सुरू असल्याचे कारण सांगून पोलिसांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला.

शुक्रवारी सकाळी मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परिसरातील एका गोणीतून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच ही माहिती ट्रॉम्बे पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गोण उघडून पाहिल्यानंतर त्यात एका महिलेचा मृतदेह होता. या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत टाकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या महिलेची ओळख पटली नव्हती. तिचा मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वीच तिथे टाकल्याचा पोलिसांना संशय होता. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध पोलिसांनी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या शोधमोहिमेतून मृत महिलेची ओळख पटली. रेश्मा असे या महिलेचे नाव असून तिच्या हत्येमागे पतीसह इतर चौघांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. दोन महिला आणि तीन पुरुष अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनीच रेश्माची हत्या केल्याचे उघडकीस आले.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...