मुंबई

वसईतील कारखान्यात बॉयलरचा स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

प्रतिनिधी

नायगाव पूर्वेला महामार्गालगत असलेल्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या स्फोटात सात कामगार होरपळून जखमी झाले आहेत. सुमारे ५० कामगार या कारखान्यात काम करीत होते; परंतु ही दुर्घटना घडली, तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ असल्यामुळे ३८ कामगार जेवणासाठी बाहेर गेले असल्याने मोठा अनर्थ टळला.

वाकीपाडा येथील ‘कॉस पावर’ कारखान्यात बुधवारी दुपारी २.४५च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली. कारखान्यात रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरायचे काम सुरू असताना बॉयलरमध्ये अचानकपणे स्फोट होऊन भीषण आग लागल्याचे सांगण्यात आले यात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले. जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ

या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले.

या स्फोटात वैष्णवी, भावेश, जयदीप राव, सागर, हर्षला व अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजय व अन्य दोन जणांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील दोन मृतांची नावे आणि दोन जखमींची नावे कळू शकली नाहीत.

Video : घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग BPCLपेट्रोल पंपावर कोसळलं, १०-१५ जण राजावाडी रुग्णालयात भरती

पुण्यातील धक्कादायक प्रकार! चक्क काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावे बोगस मतदान; मतदान न करताच फिरावं लागलं माघारी

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

कल मतदारसंघाचा : ईशान्य मुंबईत अटीतटीची लढत; मिहिर कोटेचा, संजय दिना पाटील यांचा कस लागणार

चीन ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार; अमेरिकेला टाकले मागे