मुंबई

सलमानच्या घराची शूटरकडून रेकी

Swapnil S

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरासह फार्महाऊसची शूटरने एक महिन्यांपूर्वी रेकी केली होती. या रेकीनंतर वांद्रे येथील घराजवळ गोळीबार करण्याची योजना बनवून ती प्रत्यक्षात अंमलात आली. याच प्रकरणात चौकशीसाठी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. सीसीटीव्ही फुटेजवरून दोन मारेकऱ्यांपैकी एकाची ओळख पटली असून या दोघांनी रोहित गोदाराच्या तर रोहितने विदेशात वास्तव्यास असलेल्या अनमोल बिष्णोईच्या सांगण्यावरुन हा गोळीबार घडवून आणला. मुंबई पोलिसांचे विशेष पथक लवकरच तिहार जेल, हरयाणा आणि गुरगाव येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले. रविवारी सकाळी पाच वाजता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता.

गोळीबारानंतर ते दोघेही मेहबूब स्टुडिओजवळ गेले. तेथून ते दोघेही वांद्रे-सांताक्रुझ आणि नंतर नवी मुंबईला पळून गेले होते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून ते सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन एका मारेकऱ्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचे नाव विशाल ऊर्फ कालू असून तो गॅगस्टर रोहित गोदाराचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो. कालू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो हरयाणाच्या गुरुग्रामचा रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकमध्ये एका भंगार व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्येत विशालचा सहभाग होता. विशाल हा विदेशात राहणाऱ्या रोहितच्या संपर्कात होता. दुसऱ्या सहकाऱ्याची ओळख पटली नसली तरी तो राजस्थानचा रहिवाशी असल्याचे बोलले जाते.

गुन्ह्यातील बाईक पोलिसांच्या ताब्यात

गुन्ह्यांतील बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही बाईक पनवेल येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मालकाची आहे. त्याने ती बाईक शूटरला विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच चौकशीतून दोन्ही शूटर गेल्या एक महिन्यांपासून पनवेल येथे वास्तव्यास होते. तिथे त्यांनी एक घर भाड्याने घेतले होते. त्यामुळे बाईक विक्री करणाऱ्या व्यक्तीसह घर भाड्याने देणाऱ्या घरमालकाची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीतून या दोघांविरुद्ध जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोघांनी कोणाला संशय येऊ नये म्हणून ते नोकरीसह इतर कामासाठी पनवेल येथे आल्याचे सांगत होते.

एनआयए व एटीएसकडूनही स्वतंत्र तपास

याचदरम्यान त्यांनी सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसची रेकी केल्याचेही उघड झाले. या गोळीबाराचे धागेदोरे तिहार जेलपर्यंत पोहचल्याने मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तिहार जेलमध्ये जाणार आहे. विशाल हरयाणाचा रहिवाशी असल्याने तिथेही एक पथक जाणार आहे. शूटरने ज्या रिक्षातून प्रवास केला, त्या सर्व रिक्षाचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचीही चौकशी सुरु असल्याचे बोलले जाते. या गोळीबाराची राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसकडूनही स्वतंत्र तपास सुरू आहे.

Maharashtra HSC 12th Result 2024 Live Updates: यंदाही मुलींची बाजी तर मुंबई विभागाचा सर्वाधिक कमी निकाल!

Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू

Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

KKR vs SRH: पावसामुळे सामना रद्द झाल्यास 'हा' संघ थेट फायनलमध्ये; आज ठरणार अंतिम फेरीचा पहिला मानकरी

नवी मुंबईत मॉरिशसच्या नागरिकाचा खून, छडा लागला; दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात