मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी; २ तास कामकाज ठप्प, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर  
मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी; २ तास कामकाज ठप्प, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

मुंबई उच्च न्यायालयासह वांद्रे, अंधेरी व एस्प्लानेड न्यायालयांना बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची झडती घेतली. सध्या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई उच्च न्यायालयाला गुरुवारी (दि. १८) बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. धमकीचा मेल मिळताच सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ संपूर्ण न्यायालयीन इमारत रिकामी करण्यात आली होती. सध्या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Bar and Bench च्या वृत्तानुसार, मुंबईतील वांद्रे, अंधेरी आणि एस्प्लानेड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयांनाही बॉम्बची धमकी आली आहे. वांद्रे महानगर न्यायालयाला ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची झडती घेतली. मात्र तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

दरम्यान, नागपूरमध्येही सत्र न्यायालयाला सकाळच्या सुमारास ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली. या ई-मेलमध्ये न्यायालयात आरडीएक्सवर आधारित दोन स्फोटके बसवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. सिव्हिल लाईन्स परिसरातील न्यायालयात पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवली. मात्र ही धमकीही खोटी ठरली असून कोणतीही स्फोटके सापडलेली नाहीत.

या धमकीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील कामकाज जवळपास दोन तासांसाठी स्थगित ठेवण्यात आले होते. संपूर्ण इमारत रिकामी करून सुरक्षायंत्रणांनी तपास पूर्ण केल्यानंतरच न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.

दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागील उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधी सप्टेंबर महिन्यातही मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी देणारा खोटा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

NEET सुधारणांबाबत कडक पवित्रा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश - तीन आठवड्यात अहवाल द्या

Mumbai : आणखी १५० दुमजली ईव्ही बसेस; १० ओपन डबल डेकर बसची सफर, BEST समितीची मंजुरी 

Mumbai : २२ बेस्ट डेपोंच्या विकासाला मंजुरी; पालिकेत खडाजंगी; आधीच्या डेपो-विक्रीबाबत श्वेतपत्रिका काढा- विरोधकांची मागणी

संकटाच्या भोवऱ्यात गोऱ्या साहेबाचा ब्रिटन