मुंबई

Mumbai " महापौर महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षितेत वाढ; कार्यालयासह बेसमेंटची तपासणी

बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाईला वेग देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या महापौरांचे कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल आला आणि पालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अतिरिक्त आयुक्तांना हा ई-मेल आल्यानंतर त्यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनला कळवले. आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सायबर सेलचे अधिकारी यांनी श्वानपथकाच्या मदतीने कार्यालय बेसमेंटची तपासणी केली.

Swapnil S

मुंबई : बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाईला वेग देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या महापौरांचे कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल आला आणि पालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अतिरिक्त आयुक्तांना हा ई-मेल आल्यानंतर त्यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनला कळवले. आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सायबर सेलचे अधिकारी यांनी श्वानपथकाच्या मदतीने कार्यालय बेसमेंटची तपासणी केली.

बांगलादेशी, बेकायदा फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.‌ मात्र कुठल्याही धमकीला न घाबरता जनतेची सेवा करत राहणार, असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत नेहमी चर्चा होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महापालिका मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्या संदर्भात बैठकाही झाल्या. परंतु महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षित वाढ झालीच नाही. महापालिका सुरक्षा विभागातील एक-दोन सुरक्षारक्षक प्रवेशद्वारावर दिसून येतात. मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात येते. यासाठी मेटल डिटेक्टर डोर व बॅगा तपासण्यासाठी मशीन बसवण्यात आले आहेत. मात्र या मशीनही अनेकदा बंद असतात. त्यामुळे आजच्या धमकीच्या ई-मेलने पालिकेची सुरक्षा व्यवस्था खडबडून जागी झाली आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने ही माहिती पोलिसांसह महापालिका सुरक्षा विभागाला कळवली. त्यामुळे सुरक्षा विभागामध्ये एकच खळबळ उडाली होती.

डॉग स्कॉडने केली तपासणी

धमकीच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी महापालिका मुख्यालय धाव घेतली. तातडीने महापौर दालन, महापौर कार्यालय व महापालिका मुख्यालयाची श्वानपथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्यालयात पोलिसांची एक टीम सकाळपासून कार्यरत होती.

धमक्यांना घाबरणार नाही - महापौर

अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना आपण मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी माझे काम नियमितपणे सुरू राहील, असे महापौरांनी सांगितले.

Thane : पालिकेची प्रशासकीय घडी विस्कटणार? वर्षअखेरीस अनुभवी वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार

Ulhasnagar : डॉ. मोहिनी धर्मा यांच्यावर प्रशासकीय कारवाई; आरोग्य केंद्रांतील अनागोंदी अखेर भोवली

Thane : 'रस्त्यावर थुंकू नका' म्हटल्याचा राग; परप्रांतीय कॅबचालकाकडून वृद्धाला जबर मारहाण, संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai : संक्रमण शिबिराचा अनधिकृत वापर विकासकाला भोवला; SRA कडून कारवाई; सदनिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

... तोपर्यंत 'रिकामी जागा' मानूनच कर आकारणी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय