निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना पुरेसे संरक्षण द्या Photo : X
मुंबई

निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना पुरेसे संरक्षण द्या

दाऊदी बोहरा समाजाच्या आध्यात्मिक प्रमुखांसंदर्भात २०२४ मध्ये दिलेल्या निकालावरून धमक्यांना सामोरे जात असलेले उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांना संरक्षण द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.

Swapnil S

मुंबई : दाऊदी बोहरा समाजाच्या आध्यात्मिक प्रमुखांसंदर्भात २०२४ मध्ये दिलेल्या निकालावरून धमक्यांना सामोरे जात असलेले उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांना संरक्षण द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.

या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी व्यक्तिशः लक्ष घालावे आणि सद्यस्थिती अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने नमूद केले. एप्रिल २०२४ मध्ये न्यायमूर्ती पटेल यांनी सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या बाजुने निकाल दिला. हा निकाल मागे घेण्यासाठी व युट्युबवर माफीनामा जाहीर करण्यासाठी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून दबाव टाकला जात आहे. हे धमक्यांचे सत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

लंडनमध्ये राहणाऱ्या न्यायमूर्ती पटेल यांच्या मुलीवर रस्त्यावर हल्ला करण्यात आला. त्यात तिचे नाक फ्रॅक्चर झाले. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना पुरेसे संरक्षण देण्याचे निर्देश दिले.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके