Mumbai : मूकबधिर महिलेला हायकोर्टाचा दिलासा; दोन वर्षांनंतर जामिनावर सोडण्याचे आदेश 
मुंबई

Mumbai : मूकबधिर महिलेला हायकोर्टाचा दिलासा; दोन वर्षांनंतर जामिनावर सोडण्याचे आदेश

दोन वर्षांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात उघडकीस आलेल्या हत्येच्या गुन्ह्यात संशयावरून ताब्यात घेतलेल्या मूकबधिर महिलेला उच्च न्यायालयाने जामिनाचा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : दोन वर्षांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात उघडकीस आलेल्या हत्येच्या गुन्ह्यात संशयावरून ताब्यात घेतलेल्या मूकबधिर महिलेला उच्च न्यायालयाने जामिनाचा दिलासा दिला.

गेल्या वर्षी जामीन मिळूनही जामीनदार म्हणून कोणीही पुढे न आल्याने मूकबधिर महिला तुरुंगात खितपत पडली होती. अखेर ‘दर्द से हमदर्द तक’ या संस्थेतर्फे अ‍ॅड. हिमांशू माने यांनी विनंती करताच न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी महिलेला १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.

४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री दादर रेल्वे स्थानकात प्रवासी तुतारी गाडीची प्रतीक्षा करत होते. यावेळी एका प्रवाशाकडे संशयास्पद बॅग आढळली होती. त्या बॅगेची तपासणी केली असता, आतमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. तो मृतदेह आरोपी मूकबधिर महिला रुक्साना शेखचा पती अरशद अली शेखचा असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करत रुकसाना शेख व इतर दोघांना अटक केली होती.

न्यायालयाकडून सहानुभूतीपूर्वक विचार

आरोपी मूकबधिर महिला मागील दोन वर्षे तुरुंगात खितपत पडली आहे. वर्षभरापूर्वी जामीन मंजूर होऊनही केवळ जामीनदार पुढे न आल्याने तिला तुरुंगात राहावे लागले. तसेच तिला ७ व १३ वर्षांची दोन मुले आहेत. या सर्व वस्तुस्थितीचा न्यायमूर्ती चांडक यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि मूकबधिर महिलेला दिलासा दिला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : दूषित पाण्याने मंत्रालयातील कर्मचारी बेजार; उलटी, जुलाब आणि तापाने त्रस्त, नागरिकांनाही त्रास

Video : रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात विनापरवाना डेकोरेशन; TTE निलंबित

गडचिरोली : जंगली हत्तीच्या हल्ल्यात एक ठार; Video

Mumbai : ‘के. रुस्तम’ आइस्क्रीम पार्लरचा परवाना एफडीआयकडून निलंबित

US-Iran Conflict : इराणच्या ९० तळांवर अमेरिकेचे हल्ले