मशिदींवरील भोंग्यांच्या प्रदूषणाची तक्रार कुठे करायची? हायकोर्टाचा राज्य सरकारला संतप्त सवाल  संग्रहित छायाचित्र
मुंबई

मशिदींवरील भोंग्यांच्या प्रदूषणाची तक्रार कुठे करायची? हायकोर्टाचा राज्य सरकारला संतप्त सवाल

भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क क्रमांक व्हॉट्सॲप किंवा मोबाईल ॲप उपलब्ध नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले.

Swapnil S

मुंबई : भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क क्रमांक व्हॉट्सॲप किंवा मोबाईल ॲॅप उपलब्ध नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले.

न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने जर तुम्ही कोणतीच सुविधा उपलब्ध करून दिली नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे तक्रार दाखल करायची? असा सवाल उपस्थित करत पुढील सुनावणीच्या वेळी ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमध्ये राहणाऱ्या ॲॅड. रिना रिचर्ड यांनी पहाटे मशिदीतून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणासंदर्भात समता नगर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी याचिकाकर्त्यांनी न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन होत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. हा परिसर शांतता क्षेत्र असतानाही सरकारने अद्याप गॅजेटमध्ये तशी नोंद केली नाही. तसेच ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात कोणताही संपर्क क्रमांक, व्हॉट्स‌ॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचा आरोप केला.

त्यावर सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी संबंधित विभागात शांतता क्षेत्रचे फलक लावल्याची माहिती दिली तसेच सदर विभाग शांतता क्षेत्र असल्याची गॅझेटमध्ये नोंद करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी