Mumbai : फेरीवाला परवाना घोटाळ्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : फेरीवाला परवाना घोटाळ्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल

पालिका प्रशासनाच्या वरदहस्ताने मुंबईत फेरीवाला परवान्यांचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कलम खाता यांच्या खंडपीठाने गोरेगाव पोलीस स्टेशनला याप्रकरणी चौकशी करून १४ दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले.

Swapnil S

मुंबई : पालिका प्रशासनाच्या वरदहस्ताने मुंबईत फेरीवाला परवान्यांचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कलम खाता यांच्या खंडपीठाने गोरेगाव पोलीस स्टेशनला याप्रकरणी चौकशी करून १४ दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले.

रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कलम खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी पालिकेच्या वतीने वकील चैतन्य चव्हाण यांनी, मुंबईतील ९९ हजार ४३५ अधिकृत परवानाधारक फेरीवाले असून त्यांची ओळखपत्र तपासून त्यांना परवाने देण्याचे काम सुरू आहे. तसेच २० हजार फेरीवाल्याचे ‘क्यूआर’ कोड तयार असून त्यांचे वितरण केले जात आहे. मात्र अनेकजण त्यांच्या मूळ गावी गेल्याने प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नसल्याची कबुली दिली.

गोरेगावमध्ये एका कुटुंबाच्या मालकीची पाच दुकाने असून त्यांच्याकडे तीन अधिकृत परवाने असल्याचे वकील आशिष दुबे यांनी कोर्टाला सांगितले. याची हायकोर्टाने दखल घेतली.

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

धरणे तुडुंब तरी, पाणी टंचाई 'गाळा'त! ठाणे शहरातील पाणी टंचाईची झळ कायम; पिसे, शहाड उदंचन केंद्रात गाळ साचला

२४६ गणपती विशेष गाड्यांची घोषणा; १८४ मिश्र विशेष गाड्या, ६२ अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई 'पाताळलोक'चे काम वेगवान; ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी बोगद्याचे ६५० मीटर खोदकाम पूर्ण

३६४ बसवाहकांची BEST मध्ये सरळसेवा भरती; १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू