मुंबई

बंडखोर आमदारांसाठी रॅडिसन हॉटेलच्या ७० रुम्स बुक,५६ लाख रुपये भाडे भरले

सुरत येथील हॉटेलमधून या बंडखोर आमदारांची रवानगी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये करण्यात आली आहे

प्रतिनिधी

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे मोठे केंद्र गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेल बनले आहे. या हॉटेलमध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना नेते व अपक्षांना ठेवले आहे. या बंडखोर आमदारांसाठी येत्या सात दिवसांसाठी ७० रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. यासाठी ५६ लाख रुपये भाडे भरले आहे.

सुरत येथील हॉटेलमधून या बंडखोर आमदारांची रवानगी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. यासाठी ५६ लाख रुपये भाडे भरल्याची माहिती हॉटेल व स्थानिक राजकीय नेत्यांनी दिली. तसेच रोजचा जेवण व अन्य खर्च ८ लाख रुपये आहे. म्हणजेच हे बंडखोर सात दिवस हॉटेलमध्ये राहिल्यास त्यांच्यासाठी दर दिवशी ८ लाख रुपयांप्रमाणे ५६ लाख रुपये खर्च होतील.

या हॉटेलमध्ये १९६ रुम्स आहेत. त्यातील ७० रुम्स या बंडखोर आमदारांसाठी आरक्षित केल्या आहेत. तसेच हे आमदार तेथे राहत असल्याने नवीन बुकिंग घेणे हॉटेलने बंद केले आहे. फक्त कॉर्पोरेट कंपन्यांचे बुकिंग घेतले आहे. तसेच हॉटेलमध्ये असणाऱ्या पाहुणे सोडून अन्य लोकांसाठी रेस्टॉरंट बंद केले आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा