मुंबई

जूनपासून कर्जदारांचा ‘ईएमआय’ पुन्हा वाढण्याची दाट शक्यता

वृत्तसंस्था

वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आरबीआयने मेमध्ये रेपोदरात ०.४० टक्के वाढ केली आहे. आता जूनमध्ये येणाऱ्या पतधोरणात पुन्हा व्याजदर वाढण्याचे जोरदार संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. त्यामुळे जूनपासून कर्जदारांचा ‘ईएमआय’ पुन्हा वाढण्याची दाट शक्यता आहे.

जूनमध्ये होणाऱ्या बैठकीत महागाईचा नवीन अंदाज आरबीआय जाहीर करेल. ते म्हणाले की, आर्थिक विकास वाढत आहे. मात्र, आम्हाला महागाईची मोठी चिंता आहे. रशिया व ब्राझील सोडून जगातील बहुतेश देशात व्याजदर हे नकारात्मक पातळीवर आहेत. विकसित देशांमध्ये महागाईचे लक्ष्य २ टक्के आहे. तर जपान व अन्य एका देश सोडून सर्व विकसित देशांम‌ध्ये महागाई ७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असे ते म्हणाले. वाढत्या महागाईमुळे आरबीआय चिंतेत आली आहे.

मेमध्ये आपात्कालीन बैठक करून आरबीआयने रेपो रेट ४ वरून ४.४० टक्के केला होता. आरबीआयचे पतधोरण हे दर दोन महिन्याला होते. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली होती. त्यानंतरची बैठक जूनमध्ये होणार आहे. आरबीआयने २२ मे २०२० नंतर पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये बदल केले आहेत.

यंदाच्या मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्याच्या सामानापासून तेलाच्या किमती वाढल्याने महागाई ८ वर्षांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. मे २०१४ मध्ये महागाई ८.३२ टक्के होती. आरबीआयने महागाई ६ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता; मात्र सलग चौथ्या महिन्यात महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा जास्त राहिला.

रोखतेचे प्रमाण घटवण्याचा आरबीआयचा प्लॅन

मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेत रोखतेची परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सतत कमजोर होणाऱ्या रुपयाला अस्थिर करण्यापासून रोखले जाईल. चालू खात्यातील तुटीला आपण सहजपणे सांभाळून घेऊ. भारताची निर्यात मजबूत बनत आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत