प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : पीटीच्या तासाला खेळताना मुलाचा मृत्यू; कांदिवलीमधील शाळेतील घटना

पीटीच्या तासादरम्यान शिवांग झा या आठ वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीतील शाळेत घडली.

Swapnil S

मुंबई : पीटीच्या तासादरम्यान शिवांग झा या आठ वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीतील शाळेत घडली. या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर शिवांगच्या मृत्यूमागील अधिकृत कारण समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

शिवांग पालकांसोबत कांदिवलीतील पोईसर परिसरात राहत होता. परिसरातील खासगी शाळेत तो तिसरीत शिकत होता. दुपारी पीटीचा क्लास सुरू असल्याने तो त्याच्या वर्गमित्रांसोबत खेळता होता. अचानक तो जमिनीवर कोसळला. शिक्षकांनी त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली