मुंबई

१३ रेल्वे स्थानकांवर स्तनपान सुविधा ; मध्य रेल्वे उभारणार अत्याधुनिक नर्सिंग पॉडस

नवशक्ती Web Desk

उपनगरीय रेल्वे लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. धावपळीत बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी १३ रेल्वे स्थानकांवर स्तनपान सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स बसवण्याची घोषणा केली आहे. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर फीडिंग अँड रेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्टेशन्स धोरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जागा, प्रवास करताना मातांना त्यांच्या अर्भकांना स्तनपान देण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायी जागा असेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या योजनेअंतर्गत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तीन ठाणे येथे दोन कल्याण आणि पनवेलमध्ये एक व लोणावळ्यात लवकरच दोन नर्सिंग पॉड असतील. प्रत्येक नर्सिंग पॉड माता आणि त्यांच्या बाळांना स्तनपान करण्यासाठी विशेष जागा असून, अनेक सुविधा त्यात असतील. आरामदायी उशी असलेली बसण्याची जागा, डायपर बदलण्यासाठी स्टेशन, वायुवीजनासाठी पंखा, रोषणाईसाठी प्रकाश आणि वापरलेल्या डायपरच्या स्वच्छ विल्हेवाटीसाठी एक डस्टबिन असेल.

या नर्सिंग पॉड्सच्या बाहेरील बाजूस परवानाधारकांकडून जाहिराती प्रदर्शित केल्या जातील. या जाहिराती केवळ पॉड्सच्या देखरेखीसाठी महसूल मिळवण्यास मदत करतील असे नाही, तर त्या आकर्षक पद्धतीने सादर केले जातील. उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये बाळासह विशेषत: दररोजच्या गर्दीच्या वेळेस गोंधळाचा विचार करता प्रवास करणे हे एक अतिशय कठीण झाले आहे. मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांना सामना करावा लागतो. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी नेहमीच सुविधांचा अभाव असतो . त्यामुळे, नर्सिंग पॉड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त