मुंबई

अंधेरीत ट्रान्स रेसिडेन्सी समोर गाड्यांना आग एकजण गंभीर जखमी; प्रकृती चिंताजनक

नवशक्ती Web Desk

मुंबई : अंधेरीतील महाकाली केळूज रोड, ट्रान्स रेसिडेन्सी समोर उभ्या असलेल्या तीन वाहनांना मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत फारुक सिद्दीकी (४८) ९० टक्के भाजले आहेत. त्यांना चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

अंधेरी ट्रान्स रेसिडेन्सीसमोर महाकाळी वेळूज मार्गावर तीन कार पार्क करण्यात आल्या होत्या. या गाड्यांना अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागली तेव्हा मध्यरात्रीची वेळ होती. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन २० मिनीटांत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत फारुख सिद्दीकी ( ४५) हा ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. जखमीला आधी जवळच्या ट्राम केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर भाजल्याने जखमीला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले असून, उपचार सुरू असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. दरम्यान तीन वाहनांपैकी कार क्रमांक मारुती सुझुकी वॅगन आर ( एम एच ०३ सीपी ४७८०)  तर दुसरी मारुती सुझुकी वॅगन आर ( एम एच ०२ ईएच ३९३६) या दोन कारचा तपशील मिळाला आहे. जखमी झालेली व्यक्ती ही कारमध्ये झोपलेली असताना ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. घटनेची अधिक चौकशी स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाकडून केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पोलिसांच्या अहवालाची प्रतीक्षा

अंधेरी पूर्व महाकाली केळूज रोड येथील ट्रान्स रेसिडेन्सी समोर उभ्या असलेल्या तीन गाड्यांना आग लागली. या दुर्घटनेत फारुक सिद्दीकी हे गंभीर जखमी असून, ते गाडीत झोपले होते का हे पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होईल, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस