मुंबई

पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा,पालिका आयुक्तांचे गणेशभक्तांना आवाहन

गणशोत्सवासाठी मंडप, गणेशोत्सवासंबंधीच्या परवानग्या आदी माहितीचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले.

प्रतिनिधी

लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असून बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा गणेश मुर्तीच्या उंचींवर मर्यादा नसली तरी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी गणेशभक्तांना केले आहे.

दरम्यान, सोमवारी पालिका आयुक्तांसोबत गणेशोत्सव समन्वय बैठक पार पडली. यावेळी भारतीय नौदल, मुंबई पोलीस दल, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेश उत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तीकार संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीवकुमार, आशिष शर्मा, पी. वेलरासू आदी उपस्थित होते. गणशोत्सवासाठी मंडप, गणेशोत्सवासंबंधीच्या परवानग्या आदी माहितीचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. तसेच कृत्रिम तलावांची आकडेवारी, करण्यात येत असलेले नियोजन आदीची माहितीही बैठकीदरम्यान देण्यात आली. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकांचे मार्ग २०१९ नुसार ठेवण्याचे निर्देशही बैठकीत दिले. महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये गणेशोत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्त चहल यांनी केल्या.

याची दक्षता घ्या!

महत्त्वाच्या सर्व विसर्जनस्थळी महानगरपालिकेद्वारे वैद्यकीय चाचणी व प्रथमोपचार कक्ष कार्यान्वित करण्यात येणार.

गणेशमूर्ती विसर्जन मार्गांची रस्ते खात्याने काळजीपूर्वक पाहणी करावी, मार्गांवर खड्डे असल्यास ते योग्यप्रकारे भरुन घ्यावेत.

मुंबईतील ज्या पुलांवरुन विसर्जन मिरवणुका जातात, त्या पुलांची पाहणी करावी.

विसर्जनस्थळी असणाऱ्या फिरत्या शौचालयांची स्वच्छता राखावी.

रस्त्यांवर केबल लटकत असल्यास त्या तातडीने हटविण्याचे निर्देश.

भरती-ओहोटीचे वेळापत्रक विसर्जन स्थळी ठळकपणे लावण्यात यावे.

Mumbai : भांडुपमध्ये बांधकामस्थळी दुर्घटना; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, ९ जण जखमी, VIDEO व्हायरल

Mumbai : स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याची गरज; मोटार अपघात दाव्यांसाठी उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

५३व्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चाहत्यांसोबत खास सेलिब्रेशन; पाहा VIDEO

बेकायदा बेड्या ठोकल्याबद्दल प्रत्येकी ५० हजारांची भरपाई; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

Mumbai : नायरच्या MBBS विद्यार्थ्याला सावकारी दंड; साडेतीन लाखांचे वसतिगृह शुल्क भरले नाही, तर १९ लाखांचा दंड