प्रसिद्ध चित्रकार एस. एच रझा यांचे संग्रहित छायाचित्र सौजन्य - एक्स @artfiglobal
मुंबई

Mumbai: प्रसिद्ध चित्रकार एस. एच रझा यांचे २.५ कोटींचे चित्र चोरीला; फोर्ट येथील घटना; तपास सुरू

रझा यांनी ३२ वर्षांपूर्वी ॲक्रेलिक ऑन कन्व्हासवर ४७ लांबी आणि १५ इंच रुंदीचे एक चित्र बनविले होते.

Swapnil S

मुंबई : प्रसिद्ध चित्रकार एस. एच रझा यांचे अडीच कोटी रुपये किंमतीचे चित्र अज्ञात चोरट्याने पळवून नेले. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

रझा यांनी ३२ वर्षांपूर्वी ॲक्रेलिक ऑन कन्व्हासवर ४७ लांबी आणि १५ इंच रुंदीचे एक चित्र बनविले होते. या चित्राची किंमत अडीच कोटी रुपये आहे. लिलावासाठी ते चित्र फोर्ट येथील बेलार्ड पिअर, ग्यान भवनच्या तळमजल्यावरील गुरू ऑक्शन हाऊसच्या गोदामात ठेवण्यात आले होते. या चित्राची विशेष काळजी घेतली जात होती.

जानेवारी २०२२ ते मे २०२४ या कालावधीत अज्ञात चोरट्याने कंपनीच्या गोदामात प्रवेश करून अडीच कोटींचे महागडे चित्र चोरी करून पलायन केले होते. अलीकडेच हा प्रकार उघडकीस येताच एका खासगी कंपनीच्या वतीने एमआरए मार्ग पोलिसांत तक्रार करण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला. तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक