Mumbai : मोटरमनना सिग्नलची अचूक माहिती समजणार; अपघात टाळण्यास होणार मदत 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : मोटरमनना सिग्नलची अचूक माहिती समजणार; अपघात टाळण्यास होणार मदत

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील सुरक्षित रेल्वे संचालन अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल गाड्यांमध्ये सिग्नल लोकेशन अनाऊन्समेंट सिस्टीम (एसआयएलएएस) अपग्रेड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील सुरक्षित रेल्वे संचालन अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल गाड्यांमध्ये सिग्नल लोकेशन अनाऊन्समेंट सिस्टीम (एसआयएलएएस) अपग्रेड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे मोटरमनना सिग्नलची अचूक माहिती वेळेआधी मिळणार आहे तसेच अपघात टाळण्यासोबत मोटरमनला मदत होणार आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क सर्वाधिक व्यस्त रेल्वे नेटवर्कपैकी एक मानले जाते. या नेटवर्कवर दररोज २,३०० हून अधिक गाड्या धावतात. अनेक सिग्नल कमी अंतरावर तसेच डावी, उजवी किंवा अति उजव्या बाजूला असल्यामुळे मोटरमनना तणावाखाली काम करावे लागते.

अशी काम करणार नवी प्रणाली

  • ही प्रणाली ट्रेनच्या ठिकाणाच्या आधारे पुढील सिग्नलचा क्रमांक आणि त्याचे स्थान ऑडिओद्वारे जाहीर करते. सिग्नलपासून ३५० मीटर आणि २५० मीटर आधी अलर्ट दिला जातो. तसेच ‘पिवळा’ सिग्नल ओलांडल्यानंतर 'काळजी घ्या, पुढचा सिग्नल लाल आहे' असा सतत ऑडिओ इशारा मोटरमनना देण्यात येतो.

  • पुढील स्टेशनची घोषणा ५०० मीटर आणि २५० मीटर आधी करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रणालीमध्ये विविध मार्गांवरील सिग्नल्सचे जीपीएस कोऑर्डिनेट्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आधीपासून लोड करण्यात आले आहेत. एसआयएलएएस प्रणाली मोटरमनसाठी इलेक्ट्रॉनिक ‘को-पायलट’ म्हणून काम करणार आहे. यामुळे सुरक्षितता वाढण्यासोबतच चालकांवरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल तसेच रिअल-टाइम ट्रेन ट्रॅकिंग आणि ड्रायव्हिंग बिहेवियर ॲनालिसिसद्वारे ऑपरेशनल नियंत्रण अधिक प्रभावी होणार आहे.

मुंबई पोलीस दलाची मोठी पुनर्रचना; दोन नवीन झोनची निर्मिती, पाच प्रादेशिक विभाग, १५ झोन, चार नवीन पोलीस ठाण्यांनाही मंजुरी

पोहणेही झाले आता महाग! BMC च्या जलतरण तलावाच्या शुल्कात वाढ; सभासदांना आता ५ टक्के अधिक मोजावे लागणार

रुपाली चाकणकरांची SITकडून ६ तास चौकशी; भोंदू अशोक खरातप्रकरणी आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

थलपती विजय तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; चेन्नईतील राजभवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात पार पडला शपथविधी

सरमा पुन्हा होणार आसामचे मुख्यमंत्री; उद्या शपथविधी, राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण