मुंबई

मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाकडून कारवाई; बेकायदेशीर तिकीट विक्रीची प्रकरणे उघडकीस

मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने तिकिटांचे हस्तांतरण, तिकीट दलालांवर कारवाई करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत वाहतूक दक्षता पथकाने जानेवारी ते मे या कालावधीत आठ ठिकाणी कारवाई केली. यामध्ये अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने तिकिटांचे हस्तांतरण, तिकीट दलालांवर कारवाई करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत वाहतूक दक्षता पथकाने जानेवारी ते मे या कालावधीत आठ ठिकाणी कारवाई केली. यामध्ये अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी आठ प्रतिबंधात्मक तपासणी केल्या. पथकाने फेब्रुवारी २०२५ मध्ये अंबरनाथमध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुरू असलेली बेकायदेशीर ई-तिकीट विक्री उघडकीस आली. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार हे प्रकरण बंद करण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात पथकाने कोल्हापूरमध्ये ४ तिकीट दलालांना २५ हजार ५५७ किमतीच्या ४ तिकीटांसह अटक करण्यात आली. तर मार्च २०२५ मध्ये पुणे येथे डेक्कन जिमखाना पीआरएस येथे ३ तिकीट दलालांना १० हजार ५२० किमतीच्या ३ जेसीआर तिकीटांसह पकडले. एप्रिल २०२५ मध्ये ट्रेन क्र. ११०५५ मध्ये दोन प्रवाशांना खोट्या ओळखपत्र आणि हस्तांतरित तिकीटांसह प्रवास करताना पकडले. दोघांनाही रेल्वे नियमांनुसार दंड करण्यात आला.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...