मुंबई

व्याजदरात बदलाची शक्यता कमी, पतधोरण समितीचा निर्णय आज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक मंगळवारपासून (६ फेब्रुवारी) सुरू झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या बैठकीतील निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास गुरुवारी, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी जाहीर करणार आहेत.

Swapnil S

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक मंगळवारपासून (६ फेब्रुवारी) सुरू झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या बैठकीतील निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास गुरुवारी, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी जाहीर करणार आहेत. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत सलग सहाव्यांदा व्याजदरात कोणताही बदल होणार नाही अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मासिक हप्ता कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही.

नुकताच अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर झाल्यानंतर आरबीआयने रेपो दर कायम राखणे अपेक्षित आहे. आरबीआय या बैठकीत रेपो दरात कोणतेही बदल करण्याची शक्यता नाही. कारण किरकोळ महागाई अजूनही सरकारने निश्चित केलेल्या पातळीच्या जवळ आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सध्या रेपो रेट ६.५ टक्के आहे. रेपो दर ८ फेब्रुवारी २०२३ रोजी ०.२५ टक्का वाढल्यापासून वर्षभरापासून तो याच पातळीवर राहिला आहे. किरकोळ चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या लक्ष्याजवळ आणण्यासाठी व्याजदरात कपात होण्याची शक्यता नाही. यापूर्वी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने देखील व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नाही. तेथेही व्याजदर ५.२५ ते ५.५ टक्के ठेवण्यात आले आहेत.

मे २०२२ मध्ये एक अचानक बैठक घेऊन एमपीसीने पॉलिसी रेट ४० बेसिस पॉईंटने वाढवला आणि त्यानंतर फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या प्रत्येक पाच बैठकांमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली. मे २०२२ आणि फेब्रुवारी २०२३ दरम्यान रेपो रेट २५० बेसिसने वाढवण्यात आला.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video