मुंबई

मुंबईतील सिडको जमीन घोटाळाप्रकरणी एसआयटी स्थापन; संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ; रोहित पवारांनी केले होते आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला कोट्यवधी रुपये किंमतीची जमीन दिल्याचा गंभीर आरोप केल्याप्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला कोट्यवधी रुपये किंमतीची जमीन दिल्याचा गंभीर आरोप केल्याप्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. तसेच बिवलकर हे देश सोडून जाणार असल्याची शंका रोहित पवारांनी व्यक्त केली असून, त्याआधी बिवलकरांना अटक करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील सरकारी वनजमिनी बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. हा निर्णय म्हणजे सिडको जमीन घोटाळ्याच्या चौकशीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, स्थानिक भूमिपुत्र आणि सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही सादर केलेले तब्बल १२ हजार पानांचे पुरावे, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करण्याबाबतचे लिहिलेले पत्र आणि आता राज्य सरकारने ‘एसआयटी’ स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अशाप्रकारे चोहोबाजूने मजबूत सापळा लागला आहे. परंतु, मागील काळात वेगवेगळ्या प्रकरणात स्थापन झालेल्या ‘एसआयटी’चा इतिहास बघता केवळ वेळ मारून नेण्याचे प्रकार झाले आहेत. मात्र, या प्रकरणात भ्रष्टाचारी मंत्र्याला कितीही संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही कोणत्याही भ्रष्ट माशाला या प्रकरणातून सुटू देणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

बिवलकर देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता

आरोपी नंबर दोन बिवलकर महाराष्ट्रातच असून लवकरच देश सोडणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे बिवलकर देशाबाहेर पळून जाण्यापूर्वी ‘लुकआउट नोटीस’ देऊन अटक करणे गरजेचे आहे. आम्ही एवढी स्पष्ट माहिती देऊनही उद्या बिवलकर देशाबाहेर गेल्यास राज्याचे मुख्यमंत्री त्यासाठी पूर्णपणे जबाबदार असतील, असेही रोहित पवार म्हणाले.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी