Mumbai : सीकेपी सभेच्या वास्तूचा आज लिलाव होणार की, टळणार? विश्वस्त, कार्यकारिणीच्या भूमिकेमुळे सदस्य बुचकळ्यात 
मुंबई

Mumbai : सीकेपी सभेच्या वास्तूचा आज लिलाव होणार की, टळणार? विश्वस्त, कार्यकारिणीच्या भूमिकेमुळे सदस्य बुचकळ्यात

ठाणे भारत सहकारी बँकेने सीकेपी सभेच्या दादर येथील वास्तूची बुधवार, १४ ऑक्टोबरला ११.३० वाजता लिलावाची जाहीर नोटीस दिली होती.

Swapnil S

मुंबई : ठाणे भारत सहकारी बँकेने सीकेपी सभेच्या दादर येथील वास्तूची बुधवार, १४ ऑक्टोबरला ११.३० वाजता लिलावाची जाहीर नोटीस दिली होती. त्यानंतर ६ ऑक्टोबरला संस्थेच्या विश्वस्तांची भेट घेतल्यानंतर ठाणे भारत सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी हा लिलाव चार महिन्यांसाठी काही अटींवर पुढे ढकलण्याची तयारी दाखवली होती, असे सीकेपी सभेच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते. यावर चर्चा करण्यासाठी रविवार, ११ ऑक्टोबरला बोलवण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा अडीच तासांच्या वादग्रस्त चर्चेनंतर गोंधळात कोणताही निर्णय न घेता काही अपरिहार्य कारणांमुळे तहकूब करावी लागली. त्यामुळे बुधवार, १४ ऑक्टोबरला सीकेपी सभेच्या वास्तूचा लिलाव होणार की, तो टळणार, अशा बुचकळ्यात सदस्य पडले आहेत.

सॉलिसिटर अजित ताम्हणे डीआरटीमध्ये जाऊन या लिलावावर स्थगिती मिळवण्याच्या प्रयत्नात असून  बुधवार, १४ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता त्यावर सुनावणी होणार आहे तर लिलावाची वेळ सकाळी ११.३० वाजता आहे. रविवारच्या सर्वसाधारण सभेत कोणताही निर्णय न घेता सभा तहकूब करावी लागल्यामुळे आणि ठाणे भारत सहकारी बँकेने हा लिलाव ४ महिन्यांनी पुढे ढकलण्याबाबत आजवर कोणतीही रीतसर जाहिरात न दिल्याने आता ठाणे भारत सहकारी बँकेची लिलावाबाबत नक्की भूमिका काय असणार आहे, असा प्रश्न ॲड. शिरीष देशपांडे यांनी सीकेपी सभेच्या विश्वस्तांना केला आहे.

३८ बोलीधारक

बुधवारी सकाळी ११ वाजता डीआरटी कोर्ट सुरू झाल्यावर लगेच ११.३० वाजेपर्यंत सकारात्मक अथवा नकारात्मक कोणताही निर्णय आला नाही तर बँक लिलाव करण्यास कायदेशीरदृष्ट्या मोकळी असेल. बँकेच्या लिलावाच्या जाहिरातीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून अंदाजे ३८ इच्छुकांनी लिलावात बोली लावण्यासाठी अर्ज केल्याचे विश्वस्तांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे हे सर्व इच्छुक अर्जदारदेखील लिलाव प्रक्रिया साडेअकराला सुरू करण्याचा आग्रह धरू शकतील.

काही विश्वस्तांनाच लिलावात स्वारस्य

बँकेला काही करून ४ महिने लिलाव कोणत्याही अटींशिवाय पुढे ढकलण्याची विनंती विश्वस्तांनी केली नसल्याने काही विश्वस्तांनाच या लिलावात स्वारस्य असल्याचेही बोलले जात आहे. लिलाबाबत ठोस माहिती उपलब्ध झाली नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Navi Mumbai : मोठी बातमी! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द; प्रवीण गाडेंची होणार चौकशी, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार; समृद्धी, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा मार्गांना प्राधान्य

बारामतीत हवा सुनेत्रा पवारांची; ‘सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व

चार जणांवर गुन्हे दाखल; पाच दिवसांत २,२९१ अनधिकृत फलक हटवले, महापौरांच्या पुढाकारानंंतर BMC ची विशेष मोहीम

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; केंद्रीय पथकाच्या आढावा बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले