मुंबई

मुंबई परिसरात सीएनजी महागला

महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ केली आहे. याची अंमलबजावणी २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून होणार आहे. आता एक किलो सीएनजीसाठी ७५ ऐवजी ७७ रुपये मोजावे लागणार आहेत.

Swapnil S

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ केली आहे. याची अंमलबजावणी २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून होणार आहे. आता एक किलो सीएनजीसाठी ७५ ऐवजी ७७ रुपये मोजावे लागणार आहेत. नैसर्गिक वायूच्या उत्पादन खर्चात व अन्य खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ केली आहे. १६ नोव्हेंबर २०२४ पासून एमजीएल कंपनीला गॅसच्या पुरवठ्यात १८ टक्क्यांनी कपात झाली आहे. त्यामुळे कंपनीला बाजारपेठेतून अतिरिक्त दराने गॅस विकत घ्यावा लागत आहे. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये सीएनजीच्या दरात किलोमागे १.५० रुपये वाढ झाली होती.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश