मुंबई

कोस्टल रोडची इस्रायलच्या मंत्र्यांना भुरळ; भव्य प्रकल्पासाठी सहकार्य करा; मिरी रेगेव्ह यांची BMC ला साद

Swapnil S

मुंबई : मुंबईची वाहतूककोंडी फोडणारा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. अशा प्रकारचा प्रकल्प उभारणीसाठी आमच्या देशाला सहकार्य करावे, अशी साद इस्रायलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी पालिकेला घातली आहे.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. मुंबई शहरामध्ये प्रचंड सामर्थ्य दडलेले आहे. येथील प्रगत अभियांत्रिकी आणि कुशल कामगारांमुळेच मुंबई किनारी रस्त्यासारखा महाकाय प्रकल्प वेळेत पूर्ण होत असल्याचे गौरवोद्गार मिरी रेगेव्ह यांनी काढले. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला इस्रायलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत इस्रायलचे पदाधिकारी आणि अभियंते यांच्यासह पालिकेचे उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता एम. एम. स्वामी, इस्त्राईल दुतावासातील राजकीय संबंध व विशेष उपक्रम विभागाचे अनय जोगळेकर यांच्यासह किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते, कामगार उपस्थित होते. यावेळी मिरी रेगेव्ह यांनी हाजी अली येथील आंतरमार्गिका (इंटरचेंज), प्रियदर्शनी पार्कपासून ते पारसी जिमखान्यापर्यंत भूमिगत बोगद्याची पाहणी केली.

कामाची गुणवत्ता अनुकरणीय

पालिकेने हाती घेतलेल्या या प्रकल्पाची भव्यता डोळे दीपवून टाकणारी आहे. मुंबईला लाभलेल्या सागरीकिनाऱ्याचा दळणवळणासाठी योग्य वापर केला आहे. कामाची गुणवत्ता अनुकरणीय असून, उड्डाणपूल, भूमिगत बोगदे, त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा यांचा समावेश हे सर्व कौतुकास पात्र आहे. गत काही वर्षांपासून मुंबईसह भारतात पायाभूत सुविधांची अनेक मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांची भव्यता आणि स्थापत्य अभियांत्रिकी हे संपूर्ण जगासाठी दीपस्तंभ ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.

नरिमन हाऊसला दिली भेट

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कुलाबा परिसरातील नरिमन हाऊस येथे असलेल्या निष्पाप नागरिकांचा जीव गेला. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या सैनिकांपैकी काहींना वीरमरण आले. मिरी रेगेव्ह यांनी नरिमन हाऊस येथे भेट देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त