मुंबई

ईदच्या कुर्बानीसाठी बकरी आणल्याने वाद ; मुंबईतील घटना

काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटला

नवशक्ती Web Desk

मुंबईतील मीरा रोड येथील एका बड्या सोसायटीत ईदच्या कुर्बानीसाठी बकरी आणल्याने वाद झाल्याचे समोर आले आहे. बकरी ईदसाठी दोन बकरे आणले होते. ही बाब सदर सोसायटीमधील लोकांना समजताच लोकांनी गोंधळ घातला. यासोबतच सोसायटीच्या आवारात लोकांनी हनुमान चालिसाचे पठण केले. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत राहणारे मोहसीन शेख हे बकरी ईदनिमित्त दोन बकरे सोसायटीत आणले होते. ही बाब सोसायटीत समजल्यानंतर काही लोकांनी सोसायटीत एकत्र येऊन निषेध केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार ईव्हीएममधील मतांची मोजणी

हवाई दलाच्या ताफ्यात '९७ तेजस फायटर'; ६२ हजार कोटींचा करार

आता पाकिस्तान पूर्ण टप्प्यात! भारताकडून प्रथमच ट्रेनवरून ‘अग्नी-प्राईम’ची चाचणी