Mumbai : कूपर, ट्रॉमा केअरमध्ये रुग्णांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा; केमोथेरपी, डायलिसिस बेड्स वाढवणार 
मुंबई

Mumbai : कूपर, ट्रॉमा केअरमध्ये रुग्णांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा; केमोथेरपी, डायलिसिस बेड्स वाढवणार

मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) ट्रॉमा केअर रुग्णालयातील रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) ट्रॉमा केअर रुग्णालयातील रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. कर्करोग रुग्णांसाठी केमोथेरपी सुविधा, मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी डायलिसिस बेड्सची संख्या वाढवणे, नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागाची (एनआयसीयू) निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे तसेच परिचारिकांची कमतरता दूर करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी शनिवारी दोन्ही रुग्णालयांना भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी डॉक्टरांच्या समस्या जाणून घेत त्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. आवश्यक सुविधा रुग्णालयातच उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने केमोथेरपी आणि डायलिसिस सुविधांच्या विस्तारावर बैठकीत चर्चा झाली.

नवजात बालकांसाठी एनआयसीयूवर भर!

नवजात बालकांना गंभीर परिस्थितीत तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी अतिदक्षता विभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे एनआयसीयूच्या निविदा प्रक्रियेला गती देऊन ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचाही आढावा घेण्यात आला.

परिचारिकांची कमतरता दूर होणार

रुग्णालयातील वैद्यकीय सेवांवर परिणाम होऊ नये, यासाठी परिचारिकांची कमतरता दूर करण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्याचबरोबर रुग्णालयातील कँटीनमध्ये मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता सुधारणे, जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुलभ करणे आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळविताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, या विषयांवरही चर्चा झाली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका; CJP नेत्यांची विमानातच धरपकड; दिल्लीत ७,००० जण ताब्यात; ..तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार!

ज्ञानेशसह हे सरकारही जाईल - राहुल गांधी

Mumbai : तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव

Mumbai : पदार्थांच्या पौष्टिकतेची माहिती मिळणार; FDA च्या कारवाईनंतर पालिका कॅन्टीनचा निर्णय

मला नोबेल मिळायला हवा होता; डोनाल्ड ट्रम्प यांचा नॉर्वेवर संताप; ८ युद्धे सोडवल्याचा केला दावा