मुंबई

टेन्शन वाढले; एका दिवसात रुग्णसंख्या तिप्पट

प्रतिनिधी

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असून, मुंबईसह राज्यातही एका दिवसात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे. सोमवारी राज्यात ३२८ रुग्णांची नोंद झाली होती, तर मंगळवारी तब्बल ९१९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर मुंबईत सोमवारी ९५ रुग्ण आढळले होते, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी २४२ रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईसह राज्यात कोरोनाचा धोका अन् टेन्शन वाढले आहे. फेब्रुवारी मध्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होत गेली ती आजही कायम आहे. रोज आढळणारी रुग्णसंख्या आता तीन अंकावर पोहोचली असून, राज्यात तर रोज आढळणारी रुग्णसंख्या हजारी जवळ पोहोचल्याने कोरोनाने पुन्हा एकदा मुंबईसह राज्याचे टेन्शन वाढले आहे.

राज्यात मंगळवारी ९१९ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ५१ हजार १७६ वर पोहोचली आहे, तर अकोला महापालिका हद्दीत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४६१ वर पोहोचली आहे, तर राज्यात मंगळवारी ७१० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७९ लाख ९७ हजार ८४० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे राज्यात ४,८७५ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, मुंबईत मंगळवारी २४२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५९ हजार २२५ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७५० वर स्थिरावली आहे. दरम्यान, मुंबईत दिवसभरात २१८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत मुंबईत ११ लाख ३७ हजार ९९७ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १,४७८ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान मुंबई, पुणे व नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी तीन बाधित रुग्ण आढळल्याने विमानतळावर आतापर्यंत ६६ रुग्ण आढळले आहेत. या सगळ्या बाधित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विज्ञान संशोधन संस्था व कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग