मुंबई

कोरोनाची धास्ती, तरी मुंबईकर बेफिकीर; ९४ लाख लाभार्थी बुस्टर डोस घेतला १५ टक्के लाभार्थ्यांनी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काहीसे टेंशन कमी झाले असतानाच पुन्हा एकदा ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन १ व्हेरिएंटने डोके वर काढले आहे.

Swapnil S

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काहीसे टेंशन कमी झाले असतानाच पुन्हा एकदा ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन १ व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. कोरोनावर उपयुक्त लसीची मात्रा घ्या, लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घ्या, असे आवाहन करुन ही मुंबईकरांनी दुर्लक्ष केले आहे.

मुंबईत तब्बल ९४ लाख लाभार्थी असून, त्यापैकी फक्त १५ ते १६ टक्के लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घेतल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. दरम्यान, पालिका, खासगी आणि शासकीय अशा एकूण ९४ केंद्रांवर हा बुस्टर डोस मोफत दिला जात असून लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

लसीकरणाची सद्यस्थिती

 -आतापर्यंत १४९०५९५ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. तर  नोव्हेंबरपासून कोराना प्रतिबंधक डोस नाकावाटे दिला जात असताना आतापर्यंत केवळ १२३ जणांनीच नाकावाटे डोस घेतला आहे.

- पालिकेची २४ केंद्रे, शासकीय २० आणि खासगी ५० अशा एकूण ९४ केंद्रांवर कोरोना लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे झाले असतील तर हा डोस दिला जात आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक