Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला

लोकलमध्ये दाम्पत्य तब्बल १० लाख ९५ हजार रुपयांचे सोने असलेली बॅग विसरले. याबाबत तक्रार दाखल होताच अंधेरी रेल्वे पोलिसांनी बॅगचा शोध घेत यामधील सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने आणि महागडा कॅमेरा प्रवाशाला सुखरूप परत केला.

Swapnil S

मुंबई : लोकलमध्ये दाम्पत्य तब्बल १० लाख ९५ हजार रुपयांचे सोने असलेली बॅग विसरले. याबाबत तक्रार दाखल होताच अंधेरी रेल्वे पोलिसांनी बॅगचा शोध घेत यामधील सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने आणि महागडा कॅमेरा प्रवाशाला सुखरूप परत केला. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. दरम्यान, रात्रीच्या प्रवासादरम्यान मौल्यवान दागिने आणि किमती वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना केले आहे.

अंधेरी रेल्वे पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे प्रवाशाला मौल्यवान दागिन्यांसह किमती वस्तू परत मिळाल्या. चर्चगेटकडे जाणाऱ्या अप धीम्या लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात दांपत्य चामड्याची बॅग विसरले होते. याची तक्रार करताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ संबंधित लोकलचा शोध घेऊन बॅगेचा शोध घेतला. बॅगेची ओळख पटल्यावर ही बॅग सुरक्षित ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर ही बॅग मालक करण शहा या प्रवाशाकडे सुपूर्द करण्यात आली.

या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने आढळले. याची किंमत अंदाजे १० लाख ५० हजार रुपये आहे तसेच डीजीआय ॲक्शन ४ कॅमेराची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये असा एकूण १० लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला. त्यानंतर संपूर्ण मालमत्ता बॅग मालकाकडे देण्यात आली.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त पश्चिम परिमंडळ सुनीता ठाकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वांद्रे विभाग किशोर शिंदे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई खेराडे यांनी ही कारवाई पार पाडली. यामुळे दांपत्याला मोठा दिलासा मिळाला.

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष