संग्रहित छायाचित्र 
मुंबई

जैन मंदिर परिसरात तात्पुरते शेड उभारणार; न्यायालयाची परवानगी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले (पूर्व) येथे जैन समाजाच्या श्रद्धास्थळी तात्पुरती शेड उभारणीस न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय संबंधित प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून तो श्रद्धा आणि कायदेशीर मार्गाने चाललेल्या संघर्षाला दिलासा देणारा ठरला आहे.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले (पूर्व) येथे जैन समाजाच्या श्रद्धास्थळी तात्पुरती शेड उभारणीस न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय संबंधित प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून तो श्रद्धा आणि कायदेशीर मार्गाने चाललेल्या संघर्षाला दिलासा देणारा ठरला आहे.

या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के - पूर्व विभागामार्फत शेडच्या उभारणीसाठी तातडीने काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या काळात श्रद्धा स्थळ सुरक्षित राहावे तसेच भाविकांना दर्शनाची सोय सुरळीतपणे व्हावी यासाठी शेड उभारली जात आहे. या संरचनेमुळे धार्मिक कार्यक्रम नियमितपणे सुरू ठेवता येणार आहे.

ही शेड केवळ संरक्षक उपाय नाही तर जैन समाजाच्या श्रद्धेचे आणि भावनांचे रक्षण करणारा एक महत्त्वपूर्ण भाग ठरणार आहे. ही प्रक्रिया वेगात पार पडत असून त्यामागे राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच जैन समाजसाठी सकारात्मक गोष्ट घडताना दिसत आहे, असे सांगितले जाते.

या ठिकाणी असलेले मंदिर काही दिवसांपूर्वी हटवण्यात आले होते. यामुळे स्थानिक जैन बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. मात्र त्यांनी शांततेत आपल्या भावना व्यक्त करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या निर्णयाबाबत सांगितले की, हा फक्त धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर जनआस्थेच्या विजयाची खूण आहे. जैन बांधवांच्या भावनांना मान देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो.

न्यायालयीन निर्णयामुळे विलेपार्ले पूर्वमधील जैन समाज आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, श्रद्धा आणि न्याय यांचा समतोल राखण्याचे हे सकारात्मक उदाहरण ठरले आहे.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...