मुंबई : प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आता वेस्ट प्लास्टिकपासून बेंच, पेन, टेबल अशा वस्तू बनवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. खाजगी संस्थेच्या सहकार्याने जमा झालेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. यासाठी पाच वॉर्डात कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आल्याची घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली.
२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यामुळे २०१८ मध्ये ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करण्यास बंदी घातली. त्यानंतर नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली; मात्र कोरोनामुळे ही कारवाई थंडावली होती; मात्र कोरोना आटोक्यात आल्यानंतर १ जुलै २०२२ पासून पालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे.
दरम्यान, प्लॅस्टिकच्या कलेक्शनसाठी ए विभाग फोर्ट, पी/दक्षिण गोरेगाव, आर/मध्य बोरिवली आणि सी विभागात पाच कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये जमा करण्यात आलेले आणि कारवाईत जमा झालेल्या प्लॅस्टिकचा चांगल्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जाणार आहे तर रिजेक्टेड प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून बहुउपयोगी वस्तू बनवल्या जातील. तर आगामी काळात प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी पालिकेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.