मुंबई

सीआयएसएफच्या तोतया अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

नवशक्ती Web Desk

मुंबई : घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने एका ५० वर्षांच्या व्यक्तीची सुमारे आठ लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तोतया सीआएसएफच्या अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अनंत सुब्रमण्यम मूर्ती हे चेंबूर परिसरत राहत असून, तुर्भे येथील एका सिक्सुरिटीज कंपनीत कामाला आहे. ते मूळचे चेन्नईचे रहिवाशी असून, तिथे त्यांच्या मालकीचा एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी त्यांनी एका ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांना रविवारी, २० ऑगस्टला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्याने स्वत:चे नाव दिपक पवार असल्याचे सांगून तो सध्या सीआयएसएफमध्ये नोकरी करतो. विश्‍वास बसावा म्हणून त्याने त्यांना त्याचे आधार व पॅनकार्ड पाठविले होते. भाड्याने घर घेण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगून पेमेंटसाठी त्याने त्यांना बँकेच्या ऑनलाईन अॅपमध्ये जाण्यास सांगितले. अनंत मूर्ती यांनी भाड्याने तुम्हाला हवे आहे, त्यामुळे पेमेंट तुम्हाला करावे लागणार आहे, असे सांगितले. यावेळी त्याने आर्मीच्या नियमांनुसार तुम्हाला आधी पैसे पाठवावे लागतील, नंतर त्यांना आर्मी अकाऊंटमधून पैसे मिळतील असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना टप्याटप्याटने आठ लाख अठरा हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच अनंत मूर्ती यांनी टिळकनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दिपक पवार नाव सांगणार्‍या सीआयएसएफ अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस