मुंबई

'बिपरजॉय' चक्रीवादळ होणार तीव्र; मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा हवामान खात्याचा इशारा

नवशक्ती Web Desk

भारतीय हवामान खात्यानं मच्छीमारांसाठी महत्वाची सुचना जारी केली आहे. अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या 'बिपरजॉय' या चक्रीवादळाबाबत मोठे वृत्त समोर आलं आहे. पुर्वमध्य अरबी समुद्रात घोंगावणारं अत्यंत तीव्र असं बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईच्या किनारपट्टीपासून 850, गोव्याच्या किनारपट्टीपासून 820 तर पोरबंदरपासून 850 किलोमीटर अंतरावर घोंगावत आहे. पुढील 36 तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यावर धडकणार आहे.

हे वादळ मुंबईच्या किनारपट्टीला धडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या मुंबईच्या समुद्राला उधाण आलं असून मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जाऊ नये. असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम