मुंबई : आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलीस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचे रस्ते अपघातात निधन झाले. देवदर्शनासाठी तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुधाकर पठारे हे प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होते. आपल्याच एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जात असताना त्यांची कार बसला जाऊन धडकली. या अपघातामध्ये सुधाकर पठारे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली आहे.
सुधाकर पठारे हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून मुंबई पोलीस दलात पोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शोककळा पसरली आहे. अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील वाळवणेचे रहिवासी असलेल्या पठारे यांनी एम. एस्सी. अॅग्री आणि एलएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. स्पर्धा परीक्षेतून १९९५ साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाल्यानंतर १९९६मध्ये त्यांची विक्रीकर अधिकारी वर्ग-१ म्हणून निवड झाली. १९९८मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर ते पोलीस खात्यातच रमले. पोलीस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे त्यांनी सेवा बजावली आहे, तर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलीस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे.
मुंबईत कार अपघातात दोघांचा मृत्यू
धडक बसून टॅक्सीतील चालक शंकर आणि प्रवासी रेखा परमार हे जागीच ठार झाले. आरोपी कारचालक नशेत होता का, हे जाणून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.